ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम इस्टिमेट प्रमाणे आहे का ? सुज्ञ नागरिकांचा सवाल

भाग-१

0

मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मोरगाव बु. येथे फर्निचर सह ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, अशा प्रकारचे कार्यारंभ आदेश खानदेश मजूर सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेला दि.14/11/2022 रोजी देण्यात आलेले आहे. सदरच्या कामाची मुदत चार महिने राहील हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेले आहे. तसेच सदर कामाचा दोष निवारण कालावधी सुद्धा संपलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 31 डिसेंबर 2009 मध्ये निर्देशित केल्यानुसार कामाची माहिती दर्शविणारा फलक बसविणे आवश्यक आहे. तसेच या फलकामध्ये कंत्राटदाराचे नाव कार्यारंभ आदेश कामाचा खर्च, काम पूर्ण करावयाचा दिनांक तसेच दोष निवारण कालावधी याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक असते.

या सर्व गोष्टींचा संबंधित कंत्राटदाराला तसेच प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. सदरच्या इमारत बांधकामास बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव यांचे कडून दिनांक 04/07/ 2022 रोजी तांत्रिक मान्यता आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सदरच्या बांधकामासाठी अंदाजीत रक्कम रुपये 22 लक्ष मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच फर्निचर सह ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे असा स्पष्ट उल्लेख तांत्रिक मान्यतेमध्ये देण्यात आलेला आहे. असे असून सुद्धा आजपर्यंत सदरच्या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचे फर्निचर किंवा मंजूर इस्टिमेट प्रमाणे काम झालेले दिसत नाही. या झालेल्या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? असा सुज्ञ नागरिक एकमेकांमध्ये सवाल करीत असतानां दिसत आहे. उर्वरीत पुढील भागात….

Leave A Reply

Your email address will not be published.