जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महागाई व ईडीच्या गैरवापरासह केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जळगावात काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहर जिल्हाअध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाअध्यक्ष उदय पाटिल, प्रदिप सोनवणे, दिपक सोनवणे, मुजीब पटेल, जगदिश गाढे, जाकिर बागवान, सुधिर पाटिल,सखाराम मोरे, अजमल शहा, विशाल पवार, मिराताई सोनवणे, योगिता शुक्ला, मिनाताई जावले, अमिना तडवी, अण्णा जाधव, गणेश राठोड, रमजाण मुलतानी आदि पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.