धक्कादायक; क्रूर आईनेच पोटच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले…(व्हिडीओ)

0

 

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क;

बेंगळुरू येथे एका अपार्टमेंटच्या बाल्कनीतून एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलीला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना cctv मधी कैद झाली आहे. त्यात ती महिला आपल्याच मुलीला फेक्तांना दिसत आहे. मुलीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे  पोलिसांनी सांगितले. गुरुवारी उत्तर बेंगळुरूच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये ही भीषण घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांची मुलगी ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे महिला नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

ती महिला डेंटिस्ट आहे आणि तिचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, आम्ही आईच्या मानसिक आरोग्याबाबत सर्व बाजूंनी विचार करत आहोत.

https://twitter.com/ians_india/status/1555474541815554050?s=20&t=wdU4Y1dKIuxcZlTdjjse7g

Leave A Reply

Your email address will not be published.