काँग्रेसला पुन्हा धक्का, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्री आणि आमदारांच्या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावर आता काँग्रेस वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होईल. यात नव्या नेत्याची निवड होऊ शकते.

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मंगळवारी क्रॉस वोटिंग झाली. यात काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून झाला आहे. त्यानंतर भाजप आमदारांनी सरकारकडे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी केली होती. भाजप नेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन देखील झाले होते. अशात मोठी घडामोड समोर आलीये.

काँग्रेस सरकारमधील मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सुक्खू यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. इतर काँग्रेस आमदारांनी देखील मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस हायकमांड सतर्क झाली. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुक्खू यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सुक्खु यांनी राजीनामा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.