सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आणि रामदेव बाबांचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले की पतंजली आयुर्वेदाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी औषधांसंबंधीच्या जाहिरातींबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लंघन दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालन आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरु करू नये? अशी विचारणा केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत जाहिरात करू नये. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हंटले आहे की, पतंजली आयुर्वेदाने पुढील आदेश येईपर्यंत आपल्या कोणत्याही वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करू नये. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वैद्यकीय विधान मीडियामध्ये करू नये, असे निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने असेही म्हंटले आहे की, या मुद्याला ‘ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ असा वाद बनवायचा नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर योग्य तोडगा काढायचा आहे.

आयएमएचा पतंजली आयुर्वेदावर आरोप
सर्वोच्च न्यायालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी झाली. IMA ने पतंजली आयुर्वेदावर 2022 मध्ये आरोप केला होता की, रामदेव यांची कंपनी ॲलोपॅथीच्या वैद्यकीय पद्धतीने विरोधात चुकीची माहिती पसरवत आहे. IMAची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पी.एस पटवालिया म्हणाले की, पतंजली आयुर्वेदाने योगाच्या मदतीने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाची आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

105 मिनिटात 2300 कोटी रुपये बुडाले
न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार बीएससी मध्ये पतंजली पुढच्या शेअरमध्ये सुमारे चार टक्क्यांनी घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1556 रुपयांवर आला. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर 1620.20 रुपयांवर बंद झाले 105 मिनिटांच्या ट्रेडिंग क्षेत्रात रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.