ख्रिसमस स्पेशल प्लम केक

0

खाद्यसंस्कृती विशेष

नाताळ म्हटलं  की आपल्या समोर चित्र उभे राहते ते म्हणजे सांताक्लाॅज, खूप सारे गिफ्ट्स, आणि खाऊ.  सुंदर अशा दिव्यांच्या माळांची झगमगाट, डायनिंग टेबलवर विविध प्रकारचे केक, डोनट्स, चॉकलेट्स, बियर, वाइन, रम असा लवाजमा. उद्या ख्रिसमस असून आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम/रम केक करणार आहोत. आपण या केकमध्ये काही रम वगैरे वापरणार नाही आहे, त्या ऐवजी ऍपी  ज्यूस वापरणार आहोत. चला तर मग सुरु करुयात प्लम केकची तयारी..

साहित्य:

ड्रायफ्रूट्स: काजू, बदाम, पिस्ता, काळे मनुके, रासबेरी, ब्लूबेरी (प्रत्येकी २ चमचे बारीक तुकडे करून) टूटीफ्रूटी, व ऍपी ज्यूस, बटर १०० ग्रॅम, मैदा १/२ किलो, अंडी ४, तेल १/३ कप, व्हॅनिला इसेन्स २ चमचे, साखर १/२ वाटी, बेकिंग पावडर दीड चमचा, खायचा सोडा १/२ चमचा,

कॅरमलसाठी: २ चमचे साखर

 

कृती:

१) प्रथम ऍपी ज्यूसमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स २० मिनिटं भिजवून ठेवणे. ( ऍपी ज्यूस १/२ पॅकेट किंवा बॉटल असेल तर एक वाटी ज्यूस घेणे)

२) मैदा अर्धी वाटी घेऊन त्यामध्ये बेकिंग पावडर व सोडा घालून दोन ते तीन वेळा सर्व साहित्य एकत्र करून चाळून घेणे.

३) आता कॅरमलसाठी दोन चमचे साखर मंद आचेवर विरघळून त्याचे कॅरमल करून घ्यावे आणि दोन चमचे पाणी घालून कॅरमल पातळ करून त्याचे लिक्विड करून घ्यावे.

४) ४ अंडी फोडून त्यामध्ये १/२ वाटी साखर घालून फेटून घेणे. त्यासाठी डबल बाॅयलर पद्धत वापरणे. गॅसवर कढईत पाणी ठेवून ते गरम करून घेणे व त्यावर अंड्याचे भांडे ठेवून अंडी फेटून घेणे.

५) अंडी फेटून डबल झाले पाहिजे.(त्याचा फोम झाला पाहिजे.) आता त्यामध्ये बटर टाकुन फेटावे, व नंतर तेल टाकून फेटावे.

६) फेटलेल्या अंड्यामध्ये आता भिजवलेले ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एक करून त्यामध्ये कॅरमल लिक्विड ओतून मिश्रण एकत्र करावे.

७) मैदा २ विभागात करावा. हलक्या हाताने फेटलेल्या अंड्यामध्ये दोन वेळा विभागून घालून फेटून घ्यावे.

८) इसेन्स घालून मिश्रण व्यवस्थित अगदी हलक्या हाताने एकत्र करावे.

९) केकच्या भांड्याला बटर लावून केक बॅटर त्यामध्ये ओतावे. व केकवर काजू, काळे मणूके लावून भांडे २/३ वेळा टॅप करावे.

१०) कूकर आधि १० मिनिटे गरम करायला ठेवावा. त्याची वायर काढावी व शीटी असू द्यावी. कुकरच्या तळाशी कुकरचे एक भांडे उपडे ठेवावे व त्यावर केकचे बेटर असलेले भांडे ठेवून झाकण लावून मिडीयम गॅसवर केक ३० ते ३५ मिनिटे बेक करावा. पंधरा मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून केक चेक करावा. (सुरीने किंवा टूथपीकने केक बेक झाला आहे की नाही पहावा.)

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.