दुचाकी चोरट्याला दुचाकींसह घेतले ताब्यात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.  इश्तीयाक अली राजीक अली (२०, रा. तांबापुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

इश्तीयाक अली याने तांबापुर्‍यातील रहिवाशी सादीन शब्बीर पटेल यांच्याकडे ५० हजारांची घरफोडी केली होती. २फेब्रुवारी रोजी घडलेल्या घरफोडीप्रकरणी आरोपी इश्तीयाकला अटक करण्यात आल्यानंतर रोकड जप्त करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली . मात्र आरोपीने खेडी रोड परीसरातून चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीला गुरुवार. ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास सोमवार, १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.