जळगावात नगरसेविकेला शिवीगाळ करीत विनयभंग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावातील नगरसेविकेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील ५३ वर्षीय नगरसेवक महिलेला दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका मोबाईल नंबरहून फोन आला. या फोनमधून अनोळखी इसमाने त्यांना अश्लील शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी नगरसेवक महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या अनोळखी नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.