चोपड्याच्या शरचंद्रिका पाटील तंत्रनिकेतनात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

0

चोपडा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोस्टर एक्झिबिशन स्पर्धेचे आयोजन शरचंद्रिका  पाटील पॉलीटेकनिक  येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात,  सेक्रेटरी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे ,डॉ. स्मिता संदीप पाटील व उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, यांनी केले.  गजेंद्र पाटोळे, व यांनी मतदान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच, मतदार दिवसाचे महत्व प्राचार्य विजय एन बोरसे यांनी पटवून दिले. यावेळी विद्यार्थीनी बनवीलेल्या मतदार दिवसावर घोष वाक्याचे उत्कृष्ट पोस्टर्स लावण्यात आले होते.होते. त्यात प्रथम बक्षीस कु.दिक्षा धनराज डावकर, द्वितीय लोकेश मंगेश महाले तृतीय क्र. कु.धनश्री कमलेश शिंपी व विशेष उत्तेजनार्थ हर्षल रवींद्र बडगुजर, धनश्री प्रमोद ठाकरे, मनोज ललित चौधरी व उत्तेजनार्थ हर्षाली दीपक पाटील व संयोगिता जोशी यांना मिळाले.

या कार्यक्रमात विजयी स्पर्धकांचे विशेष कौतुक महात्मा गांधी शिक्षण मंडळ अध्यक्ष .संदिप  पाटील व उपाध्यक्ष .आशाताई विजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना  एम.एस.पाटील व आभार प्रदर्शन . पी. के चौधरी यांनी केले यशस्वीतेसाठी . एन. आर. पाटील व श्री.एस एस. बाविस्कर व सर्व  शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.