खानापूरमधील अवैध धंदे बंद करा, लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे

0

मोरगाव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

खानापूर तालुका रावेर  येथील रहिवासी अवैध धंदे बंद होण्यासाठी संजय काशिनाथ कोळी यांनी दि. 27/12/2023 रोजी निवेदन दिले होते. परंतु निवेदन देवूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती, म्हणून दिनांक 16/1/2024 रोजी पुन्हा  खानापूर येथील संजय काशिनाथ कोळी यांनी निवेदन देत 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे इशारा दिला होता.

तरीही दहा दिवसामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाकडे गांभीर्याने विचार केला नाही. अखेर आज दि. 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन अवघ्या चार तासांच्या आत रावेर सहा पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी लेखी आश्वासन देऊन आमरण उपोषण थांबवावे अशी विनंती केली.

अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमरण उपोषणकर्ते संजय काशिनाथ कोळी यांना भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष राजन लासुरकर यांनी पाणी देवून उपोषण सोडविण्यात आले. यावेळी उपस्थित सहा पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, पुरुषोत्तम पाटील, राजू करोडपती, संदिप सावळे, शामराव महाजन, भास्कर चंदनकर, धनराज धांडे, दिवाकर पाटील, विलास चौधरी, छोटू जहागीरदार, बाळू भारंबे, शे शकिल, योगेश्वर महाजन, धनराज चौधरी, कुंदन चौधरी, गोलू धनगर, सुहास धांडे, जितु पाटील, हर्षल महाजन, पप्पु सोनवणे, गोकुळ महाले, जितु चौधरी व ग्रामस्थ यांचा  पाठिंबा मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.