औरंगाबाद,लोकशाही न्युज नेटवर्क
शेंद्रा येथील ऑरिक सिटीमध्ये (In Auric City) ५ ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या मराठवाडा “स्मॉल स्केल इंडस्ट्रीज “(Small Scale Industries) अँड “ॲग्रिकल्चरल असोसिएशनच्या”(Agricultural Association) (मसिआ) महाॲडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोच्या उद्घाटनासाठी जात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिगाडामुळे दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी दिली आहे.
३० एकरांवर होत असलेल्या या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. मराठवाड्यातील उद्योग वाढीसाठी हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गुंतवणूकदार, उद्योजकांनी सकाळी १० ते २ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, व विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी दुपारी २ वाजेनंतर वेळ देण्यात आला आहे. अनेक नामांकित कंपन्या लघु उद्योजकांना (Small entrepreneurs) काम देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास बिझनेस टू बिझनेस मिटिंग आयोजित करण्यात आल्या आहेत. यासोबत रॉयल एनफिल्ड, भारत फोर्ज, जेसीबी, आनंद ग्रुप, बजाज ऑटो , इंड्युरन्स, व्हेरॉक, संजीव ऑटो आदी कंपन्यांचे वरिष्ठ पर्चेस आणि मटेरियल अधिकारी प्रदर्शनाला भेटी देतील.