‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे144 ट्रेन रद्द

0

चेन्नई ;- मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला असून 144 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक ट्रेनचा मार्घ बदलण्यात आले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉन्ग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यांतील परिस्थितीची माहिती घेत तयारीचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवामान खात्याने आज उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ ‘मिचॉन्ग’ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं आहे. या काळात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान मिचॉन्ग चक्रीवादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी, कराईकल आणि यानम भागात 4 डिसेंबरला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.