भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज हस्तगत ; दोन जणांना अटक

0

भुसावळ ;- भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी  18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी चाळीसगाव व नाशिक यांचे कनेक्शन समोर आले होते. त्यात भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल परिसरात काहीजण ड्रग्ज मोठा साठा घेवून जात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार यां ना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता हॉटेल परिसरातून कुणाल भरत तिवारी (३०, रा.तापी नगर, भुसावळ) आणि जोसेफ जाॕन(३२, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांना ड्रग्जच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले

विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी  यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.