नितीन गडकरींची मोठी घोषणा ; मोटार वाहन कायद्यात बदल होणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली.

वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते.

कायद्यातील प्रमुख बदल –

– मोटर गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य
– आठ आसनी वाहनापर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग सक्तीचे राहील.
– सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार मानांकन दिले जाईल.
– वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण आणणार.
– सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली राहील.
– दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये बदल केले जातील.
– चालकाला डुलकी येत असल्यास वाहनातील अलार्म सुरू होईल.
– नियमित अपघात होणाऱ्या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सूचना दिली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.