अवकाशात चांद्रयान ३ ने घेतली ऐतिहासिक झेप! (पहा व्हिडीओ )

0

श्रीहरीकोटा ;- आज चांद्रयान दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी झेप घेतली असून . दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित करण्याचे इस्रोने जाहीर केले. संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान -३ ने आज (१४ जुलै) दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोट येथील सतीश धवन आंतरिक्ष केंद्रातून अवकाशात झेप घेतली.सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी (India) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) इस्रोच्या विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत प्रक्षेपित केले जात आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. यात मंगलयान, चांद्रयान १, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ यांचा समावेश आहे. जवळपास ४ वर्षांपूर्वी विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत चांद्रयान २ प्रक्षेपित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -२ व्यवस्थित उतरु शकले नाही. त्यामुळे ही मोहीम त्यावेळी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान -३ ने अवकाशात झेप घेतली. तसेच चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनपर ट्वीट!

चांद्रयान ३ नं भारताच्या अवकाश कार्यक्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्नं पूर्ण करणारी ही कामगिरी आहे. ही कामगिरी म्हणजे आपल्या वैज्ञानिकांच्या निष्ठेचीच साक्ष आहे – नरेंद्र मोदी

आज प्रक्षेपण, २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार!

दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. हे यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयान ३ चं प्रक्षेपण पाहाण्यासाठी सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावर २०० शाळकरी विद्यार्थी दाखल! झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.