‘जवान’च्या प्रिव्ह्यूमधील ‘या’ गोष्टीने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे याचा जवान (Jawan) चित्रपट. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि नयनतारा (Nayantara) या सुद्धा शाहरुख खानसोबत चित्रपट झळकणार आहे. किंग खान याच्या आगामी सिनेमाची प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा प्रिव्ह्यू चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. प्रिव्ह्यू प्रदर्शित झाल्यांनतर चाहत्यांच्या मनातील सिनेमाची अधिक वाढली आहे. सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये अभिनेता एका वेगळ्या भुमीकेत दिसत आहे. सिनेमातील अभिनेत्याचा नवा लूक तर चाहत्यांना आवडला आहे. पण अभिनेत्याचा डोक्यावर असल्यावर असलेल्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सर्वत्र शाहरुखच्या टॅटू चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर अभूनेत्याच्या नवीन लूक तुफान व्हायरल होत आहे. एवढाच नाही तर, किंग खान याने गुरुवारी #AskSRK च्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. अभिनेत्याने देखील चाहत्यांच्या प्रेत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. पण अभिनेत्याच्या टॅटूची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे.

सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खानच्या डोक्यावर डाव्या बाजूला टॅटू दिसत आहे. शाहरुख खानच्या डोक्यावर असलेल टॅटू संस्कृत भाषेत लिहलेलं दिसत आहे. टॅटूमध्ये “माँ जगत जननी” असं लिहल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.