ब्रेकिंग : अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर ; कुणाकडे कोणती खाती पहा …

0

 

मुंबई ;- राष्ट्रवादीमध्ये बंड करून सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचे दहा दिवसांपासून खातेवाटप रखडले होते. अनेक बैठकांनंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार आणि धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रालयाची जबाबदार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमळनेरचे अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन हे महत्वाचे खाते मिळाले आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड केले. त्यांना पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्यासह ८ जणांन मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, १० दिवसांनंतरही खातेवाटप न झाल्याने बिनखात्याचे मंत्री म्हणूनच ते वावरत होते. सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे नेते अर्थ, सहकार, कृषी या खात्यांसाठी आग्रही होते. परंतु शिवसेना आणि भाजपचे आमदारांचा विरोध होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सर्वात महत्त्वाचे अर्थ आणि गृह अशी दोन खाती होती. त्यापैकी अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही राष्ट्रवादीकडेच जाणार असून दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

तसेच वादग्रस्त विधाने आणि कारनाम्यांमुळे वारंवार अडचणीत सापडणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे दिले जाणार असल्याचं बोलंल जात आहे. आदिती तटकरे महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय खातेही  शक्यता आहे.

मंत्र्यांची यादी

अजित पवार – अर्थ व नियोजन

धनंजय मुंडे – कृषी

दिलीप वळसे -पाटील – सहकार

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा

आदिती तटकरे – महिला व बाल कल्याण

अनिल पाटील – मदत व पुनवर्सन

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

संजय बनसोडे – क्रिडा

धर्मराव आत्रम – अन्न व औषध प्रशासन

 

Leave A Reply

Your email address will not be published.