चंद्रकांत पाटील शाईहल्ला प्रकरण, 11 पोलिसांचं निलंबन

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवडमध्ये उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या शाईफेक प्रकरणी प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन (Police Suspended) करण्यात आलं आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कडक बंदोबस्त असताना देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान आता या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबित करण्यात आलं आहे.

याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.

तसेच एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. सत्ता गेली त्यामुळं सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरु असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काल पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.