दूध संघ निवडणुकीत खडसे पॅनलचा धुवा !

0
  • मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या शेतकीरी पॅनलने मारली बाजी 
  • मंदाताई खडसेंचा आ. मंगेश चव्हाणांकडून पराभव 
  • खडसे पॅनलचे अवघे दोन उमेदवार विजयी 
  • चार आमदारांचा विजय 

 

लोकशाही ऑनलाईन डेस्क : जळगाव, दि. ११ डिसेंबर २०२२ : जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी खडसे गटाच्या सहकार पॅनलचा दारूण पराभव झाला. असून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामीविकास  मंत्री गिरीश महाजनांच्या शेतकरी पॅनलने बाजी मारली आहे. २० पैकी १८ जागांवर शेतकरी पॅनलचे उमेदवार विजयी.

विशेष म्हणजे दूध संघाच्या विद्यमान चेरमन  मंदाताई खडसे यांचा आ.मंगेश चव्हाण यांनी पराभव केल्याने एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या एकूण २० जागांसाठी काल मतदान होऊन आज मत मोजणी पार पडली. त्यात पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांची जागा बिनविरोध आली असून त्यांचे साठी शेतकरी पॅनलचे शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माघार घेतली होती. त्यामुळे दिलीप वाघ हे राष्ट्रवादीचे असले तरी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या पॅनलचे उमेदवार समजले जातात. मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव तालुका मतदार संघातून तर गिरीश महाजन जामनेर तालुका मतदार संघातून मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहे. आज सकाळी येथील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघ निहाय उमेदवारांचा निकाल पुढील प्रमाणे.

उमेदवार निहाय मिळालेली मते

मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अप्पा (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते 170) ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील ( एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन ( 205)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील(एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)

महिला राखीव मतदार संघ: छाया देवकर (एकूण मते 235) पूनम पाटील (एकूण मते -), सुनीता पाटील (एकूण मते 192), उषा पा.(एकूण मते-), मनीषा सूर्यवंशी (एकूण मते -164)

अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते 161), आ. संजय सावकारे (276)

वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)
गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230)

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.