भयंकर.. गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे एक भयंकर घटना घडली आहे. चरित्र्याच्या संशयावरून पतीने गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील रोहिणी भोईटी येथील राजेश जगन पावरा (बारेला) (वय-२८) हा तरुण आपल्य पत्नीसोबत चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारातील शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होते. गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये चरित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशयावरून हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन खून केला. हे क्रूर कृत्य त्याने तळोंदा दिगर शेत शिवारात केले आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा याला अटक केले. याप्रकरणी रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.