कासमवाडीत वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव : पत्नीचे निधन झाले आहे तर मुलगा अमेरीकेत स्थायिक असल्याने कामसवाडीत एकटेच राहत असलेल्या सोपान जगन्नाथ ढाके (वय ७५) यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील कासमवाडीमधील उर्दू शाळेच्या बाजूला सोपान ढाके हे वृद्ध एकटेच वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे निधन झालेले असून त्यांचा एकुलता एक मुलगा चेतन सध्या New Zealand स्थायिक झाला आहे. त्यामुळे सोपान ढाके हे घरी एकटेच राहत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही आहे.

घटना त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली. त्यानुसार पोकॉ छगन तायडे, विशाल कोळी, जमील शेख, रतीलाल पवार हे घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.