दुर्देवी.. मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील कानळदा येथून एक दुर्देवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना चक्कर येवून पडल्याने जितेंद्र ज्ञानेश्वर बाविस्कर (वय २८, रा. काळनदा) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुक्यातील कानळदा येथे सोमवारी गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये  जितेंद्र बाविस्कर हा तरुण नाचत असतांना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. दरम्यान गावातील तरुणांनी तात्काळ त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी प्राथमिक तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.