आदिवासी कोळी समाजातर्फे तीव्र आंदोलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आदिवासी कोळी समाज जळगाव जिल्हाच्या वतीने ओक मंगल कार्यालय जळगाव येथे आदिवासी कोळी समाजाच्या सर्व संघटना व सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक माजी जि प गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी वैधकीय अधिकारी डॉ शांताराम दादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी यांना कोळी नोंदीहून अनुसूचित जमातीचे दाखले विनाअट सरसकट द्यावें, ज्या कोळी समाजाच्या बांधवांकडे कास्ट व्हलेडीटी आहे त्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्रे न मागता व्हलेडीटी देण्यात यावी. जळगाव-धुळे जिल्हाकरीता एसटी व्हलेडीटी समिती कार्यालय जळगाव येथे मंजूर असतांना ते धुळे येथे आहे. ते कार्यालय जळगाव येथे स्थलांतरित करावे आदिवासी कोळी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी महर्षि वाल्मीकी यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. अशा अनेक विषयांवर विचार विनिमय करून या मागण्यांसाठी प्रशासनांकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास ती मिळविण्यासाठी लवकरच आदिवासी कोळी समाज तीव्र आंदोलन करणार अशा निर्णय आदिवासी कोळी समाजाच्या सर्व संघटनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला यावेळी जेष्ठ नेते उत्तमराव सपकाळे, शांताराम सपकाळे माजी डिवायएसपी राजेंद्र रायसिंग, छगन देवराज माजी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, बि टी बाविस्कर माजी सभापती डि पी साळूंखे, जगन बापू बाविस्कर, मुकेश सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे, संजय कांडेलकर, सुभाष सोनवणे, मनोहर कोळी, मोहन शंकपाळ, योगेश बाविस्कर, ॲड अमित सोनवणे, मगन बाविस्कर, रवि नन्नवरे, ॲड अनिल नन्नवरे,भिकन नन्नवरे, ॲड गणेश सोनवणे, नामदेवराव येळवे, संभाजी सोनवणे, नगरसेवक किशोर बाविस्कर, हेमलता सोनवणे, मंदा सोनवणे, शोभा कोळी, कोळी संयुक्त बैठकीचे प्रास्ताविक जितेन्द्र सपकाळे सर यांनी तर, सुत्रसंचालन प्रल्हाद सोनवणे यांनी केले. आभार नामदेव कोळी यांनी मानले. बैठक यशस्वी करण्यासाठी संदीप कोळी, दिपक तायडे, देविदास कोळी, खेमचंद कोळी, विकास कोळी, विशाल सपकाळे, दिपक कोळी, यांनी परिश्रम घेतले. या बैठकीत आदिवासी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ आदिवासी वाल्मीक लव्य सेना, अखिल भारतीय कोळी समाज संघटना आदिवासी क्रांती सेना, स्वराज कोळी समाज संघटना आदिवासी टोकरे कोळी समाज संघटनांसह इतर आदिवासी कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी बांधव युवक कार्यकर्ते व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.