कर्तव्य बजावताना होमगार्डचा मृत्यू

0

चाळीसगाव ‘- येथील बस स्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या ५२ वर्षीय होमगार्डचा बुधवारी १७ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.

शहरात सुरु असलेल्या पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्यासाठी ठिकठिकाणी होमगार्ड व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील बस स्थानकावर सय्यद हाफीज सय्यद रऊफ (वय ५२) या जळगाव येथील रहिवासी असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाची ड्यूटी लावलेली होती. सय्यद हे बस स्थानकासमोरील रस्त्यावर कर्तव्यबजावत असताना सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवायला लागला. या वेळी त्यांच्या सोबत बंदोबस्ताला असलेले त्यांचे सहकारी पोलिस कॉन्स्टेबल मुकेश बिऱ्हाडे यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत झाल्याचे सांगितले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.