WhatsApp चे ‘हे’ नवीन फिचर आहे खूपच भन्नाट, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इन्स्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने जगभरात पुन्हा धमाका केला आहे. व्हॉट्सॲप चॅनलवर युझर फिदा झाले आहे. जगभरातील जवळपास २ अब्ज युझर त्याचा वापर करत आहेत. वेळोवेळी मेटा नवनवीन फिचर जोडते. गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने चॅनेल हे फिचर समोर आणले होते. यामुळे युझर्सला व्हिडिओ तयार करता येतो. त्यांना त्यांच्या फेव्हरेट फेव्हरेट क्रिएटर, संस्था, सेलेब्रिटी यांचे व्हिडिओ पाहता येतात. त्यांना फॉलो करता करता येते. विशेष म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक पण त्यासाठी देण्याची गरज नाही. आता मेटाने या फीचरमध्ये अजून काही गोष्टी जोडल्या आहे.

३ नवीन फिचर जोडले

व्हॉट्सॲप चॅनल्समध्ये ३ नवीन फिचर जोडले. यामध्ये चॅनल्समध्ये ३ नवीन फिचर जोडले. यामध्ये व्हाईस मॅसेज, पोल्स आणि शेअर टू स्टेट्स हे नवीन फीचर जोडण्यात आले आहे. या फिचर अंतर्गत चॅनल एडमिन एका पेक्षा अधिक एडमिन तयार करू शकतो. त्यामुळे एडमिन व्यतिरिक्त इतर एडमिन पण चॅनलवर फॉलोअर्स जोडू शकतील.

चॅनलमध्ये जोडल्या गेलेले युझर्स आता मल्टि मीडिया मॅसेजच्या सहायाने थेट त्यांचे स्टेटस शेअर करु शकतील. त्यांच्या फेव्हरेट सेलेब्सच्या डे-टू-डे पोस्टला त्यांच्या मित्र परिवारात स्टेटच्या माध्यमातून मांडू शकतील. व्हॉट्सॲपवर तुम्ही पण तुमचे चॅनल तयार करु शकता. चॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला स्टेट्स टॅबच्या अंतर्गत न्यू चॅनलचा पर्याय देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.