बॉक्सिंग खेळताना डोक्याला मार लागून पिंपळनेरच्या तरुणाचा मृत्यू

0

चाळीसगाव :- पुण्यातील खडकवासला येथे सैन्यदलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या पिंपळनेरच्या तरुणाचा बॉक्सिंग स्पर्धेच्या सरावादरम्यान डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची  घटना बुधवारी (दि.१८) समोर आली. प्रथम गोरख महाले असे जवानाचे नाव आहे. बालपणापासूनच देशसेवेची आवड असलेल्या प्रथमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याआधीच नियतीने हिरावून घेतले. दरम्यान,

चाळीसगाव तालुक्यातील सायगावया मुळगावी त्याच्यावर गुरुवारी दि. १९) सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साक्री तालुक्यातील बल्हाणे येथील आ.मा. पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक गोरख महाले व इंदिरा कन्या विद्यालयाच्या शिक्षिका एस.एस. शेवाळे यांचा एकुलता एक मुलगा प्रथमला बालपणापासून लष्करी सेवेची आवड होती. त्याचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी सैनिकी स्कूल सातारा येथे त्याची निवड झाली. पहिल्याच प्रयत्नात त्याची” २०२१ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीत निवड झाली. पुण्यातील खडकवासला येथे एनडीएच्या १४५ बॅचमध्ये लष्करी प्रशिक्षण सुरू झाले. त्यानुसार प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्यात जवानांना तीन प्रकारच्या लष्करी स्पर्धांमध्ये ल सहभागी व्हावे लागते. त्यानुसार प्रथमने बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. १६ ऑक्टोबरला बॉक्सिंगची स्पर्धा होती. त्यादरम्यान पहिल्या फेरीत त्याच्या डोक्याला मार लागला. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि हे दुसऱ्या फेरीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी तो चक्कर येऊन पडला. त्याला एनडीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेनंतर तो कोमात गेला. बुधवारी (दि. डे १८) पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने पिंपळनेरमध्ये शोककळा पसरली. प्रथमचे आई-वडील हे धुळे. ना. जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. त्यामुळे ते पिंपळनेर येथे वास्तव्यास आहेत.

बेस्ट कॅडेट म्हणून लौकिक: दोन वर्षे खडतर प्रशिक्षण व परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून बेस्ट कॅडेट म्हणून त्याने लौकिक प्राप्त केला होता . त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी 30 ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार होता त्यानुसार त्याचे प्रशिक्षण शेवटच्या टप्प्यात होते. त्यानंतर तो कर्नल म्हणून सैन्य दलात दाखल होणार होता.

म्हणून त्याने लौकिक प्राप्त केला. त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी ३० ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार होता. त्यानुसार त्याचे प्रशिक्षण शेवटच्या टप्यात होते. त्यानंतर तो कर्नल म्हणून सैन्यदलात दाखल होणार होता. ही एनडीएने व्यक्त केल्या सहवेदना : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) ने प्रथम महालेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच्या पार्थिवदेहावर व्हाइस अॅडमिरल अजय कोचर यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली

Leave A Reply

Your email address will not be published.