लोकशाही न्यूज नेटवर्क
साऊथ सुपरस्थर अक्किनेनी नागार्जुनाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवंगत दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि नागार्जुनची बहीण नागा सरोजा यांचं निधन झालं आहे.
नागा सरोजा यांच्या निधनामुळे नागार्जुनच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागा सरोज या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागा सरोज यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अक्किनेनी नागार्जुन यांच्या घरात शोकाकुल वातावरण आहे. नागा सरोजा ही अभिनेता नागार्जुनची तिसरी मोठी बहीण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना पाच मुले होती आणि नागा सरोजा या तिसऱ्या अपत्य होत्या. अक्किनेनी नागेश्वर राव यांना सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा, वेंकट आणि नागार्जुन अशी पाच मुलं होती.
मंगळवारी सकाळी नागा सरोजा यांचा मृत्यू झाला असला, तरी ही घटना उशिरा उघडकीस आली. नागा सरोजा यांच्या मृत्यूने अक्किनेनी कुटुंबीय दु:खी झाले आहेत. सरोजा यांच्या निधनाती माहिती कळताच साऊथमधील सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती नागार्जुनला भेटायला येत आहेत. बुधवारी नागा सरोजा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.