महिलेची पर्स लांबविणाऱ्या चोरट्या तीन महिलांचा नागरिकांनी केला पाठलाग …

0

चाळीसगाव शहर पोलिसांच्या केले स्वाधीन ; आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा

 

चाळीसगाव : ;- एसटी बसमधून खाली उतरणाऱ्या महिलेच्या ताब्यातील २६ हजारांच्या सोन्याच्या दागिण्यांचा ऐवज असलेली पर्स लांबवताना नागरीकांनी पाठलाग करून सिल्लोडच्तीन महिलांना पकडून चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शहरातील भडगाव रोडवरील खरजई नाक्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता घडली.याप्रकरणी तिघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा समाधान चौधरी (28, मालेगाव, जि.नाशिक) ही विवाहिता खरजई नाक्यावर बसमधून खाली उतरत असताना तीन चोरट्या महिलांनी महिलेच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावून पळ काढला असता महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर इतर नागरिकांनी तीन महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडून चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. यात संशयित संगीता रमेश म्हसंजोगी (30), ईश्वरी मल्याडू म्हसंजोगी (35) व शिरीषा राघो म्हसंजोगी (25, सर्व रा.पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड. जि.छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा महिलांची नावे असून आशा चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.