चारित्र्याचा संशय घेत चार लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पतीच्या व्यवसायासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना दि. १७ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या मडळींविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ममुराबाद येथे माहेर असलेल्या निकीता विवेक पाटील यांचा विवाह विवेक पाटील यांच्यासोबत झाला आहे. सासरच्यांकडून वारंवार विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडन मारहाण केली जात होती. तसेच विवाहितेची सासू, सासरे, जेठाणी हे तुझ्या वडीलांकडन तुझ्या पतीला व्यवसायासाठी चार लाख रु पये घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली होती. तसेच विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला जात होता.

ने विवाहिता माहेरी निघून आल्यात्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार विवाहितेचा पती विवेक अनिल पाटील, सासरे अनिल विक्रम पाटील, सासू सुलोचना अनिल पाटील, जेठ जनार्दन अनिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.