माहेरहून चारचाकी घेण्यासाठी ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव ;- माहेरहून चारचाकी घेण्याच्या मागणीसाठी पाच लाखांसाठी २८ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याने सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलीस सटेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहितीत अशी कि पिंप्राळा येथील माहेर असलेल्या ज्योती मंगेश पाटील वय २८ यांचा विवाह पाचोरा येथील मंगेश पाटील यांच्यासोबत झाला होता. २९ जून २०१८ ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती मंगेश राजेंद्र पाटील,राजेंद्र , राजेंद्र पाटील,श्यामकांत राजेंद्र पाटील,साधना राजेंद्र पाटील, मनीषा श्यामकांत पाटील ,प्रमिला दीपक पाटील,दीपक अजबराव पाटील सर्व रा. पाचोरा यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.