जामनेर तालुक्यात ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांवर गुन्हा

0

जामनेर ;- तालुक्यातील नेरी दिगर आणि तळेगाव येथे १४ रोजी मानवी शरीरास अपयायकारक विषारी गुंगीकारक ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, तळेगाव ता. जामनेर येथे आरोपी श्यामलाल राजपूत आणि वीरू अण्णा पूर्ण नाव माहीत नाही हे दोघे १४ रोजी आमखेडा रोडवर ताडीसदृश्य द्रव्य विक्री करताना आढळून आले . मात्र पोलिसांना पाहताच आरोपींची धूम ठोकली . त्यांच्याकडून ३ हजार रुपये किमतीची ताडी आणि ३ हजार २३७ रुपयांचा गुटखा वगैरे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . तसेच नेरीदिगर येथे जुने बस स्टॅन्ड परिसरात वाघूर नदी किनारी भागीनाथ गुत्तेदार आणि सचिन भीमरावा भंडारी हे दोघे ५ हजार २०० रुपयांची ५२ लिटर ताडी रोख ५०० आणि ७५० रुपयांचा इतर मुद्देमाल आढळून आला . त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ लीलाधर भोई आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.