विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा

0

जळगाव: शहरातील हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हरिविठ्ठल नगरातील जयश्री सचिन डांबरे यांचा मध्यप्रदेशातील सिटी इंदोर येथील सचिन मुरलीधर डांबरे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर काही दिवसांनी वेगवेगळ्या कारणावरून पती सचिन यांच्यासह सासरच्या मंडळींनी जयश्री हिला शिवीगाळ करत मारहाण केली, अशाच पध्दतीने वेळावेळी जयश्री हिचा मानसिक व शारिरीक छळ केला, अखेर छळ असह्य झाल्याने जयश्री ह्या माहेरी जळगावातील हरिविठ्ठल नगरात निघून आल्या. व त्यांनी छळाबाबत गुरुवारी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन जयश्री हिचे पती सचिन डांबरे, सासू प्रभा डांबरे, दीर अलोक डांबरे, देरानी माधुरी डांबरे, सर्व रा सिटी इंदोर, मध्यप्रदेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.