नात्याबाबत चहल ने अखेर सोडले मौन, म्हणाला…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबतच्या कथित “घटस्फोट” संबंधी पोस्ट्स सोशल मीडियावर गाजल्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चहलने लिहिले, “तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया ते बंद करा. प्रत्येकासाठी प्रेम आणि प्रकाश.”

चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत ते एकत्र व्हिडिओ पोस्ट करत असतात. डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. धनश्री वर्मा ही युट्युबर आणि डान्स कोरियोग्राफर आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे चहल हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमधील स्टार परफॉर्मर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.