धक्कादायक; कारागृहातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

नाशिकरोड कारागृहातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. विशेष म्हणजे काल जीवघेना हल्ला झाला तरी अद्याप या संदर्भात पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीय. एकूणच या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात राडा करून आलेल्या 10 ते 12 कैद्यांनी जेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करत नाशिक सेंट्रल जेलमध्ये राडा घातला. यामध्ये प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याची दखल राज्याच्या जेल उपमहानिरीक्षक यांनी घेतलीय. पण या घटनेनं जेलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

प्रभूचरण पाटील यांच्याकडे भांडार सहा आणि सात अशा दोन ठिकाणची जबाबदारी देण्यात आलेली होती. या दोन्ही ठिकाणी जवळपास 500 पेक्षा जास्त कैदी आहेत. काल कर्त्यव्यावर असतांना जवळजवळ दहा ते बारा कैद्यांनी पाटील यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला.

Leave A Reply

Your email address will not be published.