साहेब आमचे विठ्ठल तुम्हीच ; या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले – छगन भुजबळ

0

मुंबई: – माझा फोटो बॅनर्सवर वापरु नका असे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हाला सांगतात . पण पवार साहेब हा आमचा विठ्ठल आहे. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडब्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. ते बुधवारी मुंबईत अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होते.

साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब आणि माँसाहेबांनाही इतकंच वाईट वाटलं असेल. तुम्ही मला तेव्हा तिकडेच थांबा, असे सांगितले नाही. तुम्ही धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही असेच अश्रू तरळले असतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.