ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित यांची बदली रद्द

0

जळगाव ;-जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती श्री. अंकित यांनी लोकशाहीशी बोलताना दिली. तसेच बुलढाणा येथे त्यांच्या जागी धुळे येथील सीईओ शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वतः श्री. अंकित यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्याचे आदेश काढण्यात येऊन त्यांच्या जागी जळगाव येथे धुळे येथील सीईओ असलेले शुभम गुप्ता रूजू होणार होते. मात्र शासनाकडून त्यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात येऊन त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा परिषदेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती श्री. अंकित यांनी बोलतांना दिली.

श्री अंकित गेल्या ९ ते १० महिन्यापुर्वीच जळगाव जि.प. त रूजू झाले होते. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. आचारसंहितेनंतरच त्यांची बदली होईल अशी चर्चा होती. मात्र मंगळवारी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांचे आदेश जि.प. ला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले . मात्र त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा सीईओपदी नियुक्तीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.