अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी 

तरुणाने दिले जीवनदान 

0

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावरील वेस्टन हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने काळविटाच्या मागील दोन्ही पायाचा चैदामेदा झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच शहरातील सचिन माळी यांनी धाव घेत काळवीटाला उपचारासाठी पशु वैद्यकिय रुग्णालयात आणले.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टन जवळ दुपारच्या वेळी फुलगाव शेती शिवाराकडून अंदाजे चार वर्षाचे काळवीट महामार्ग ओलांडून जाडगाव शेती शिवाराच्या दिशेने पळत जात असताना अचानाक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने काळवीटास जबर धडक दिल्याने त्याच्या मागील दोन्ही पायाचा अक्षरशा चैदामेंदा झाला. हे दृश्य बाजूला असलेल्या ऊसाची रसवंती चालक नाना माळी यांच्या लक्षात येताच त्यांनी सचिन माळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

सचिन यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली तोवर काळवीट आपल्या जिवाच्या आकांताने दोन्ही पाय घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या मक्याच्या शेतात जाऊन पडले. त्याला शोधुन आपल्या चारचाकी वाहनात घालून वरणगाव येथील पशु वैद्यकिय रुग्णालयात उपचारासाठी आणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यास घटनेची माहिती दिली. डॉ. दर्शना उभाडे यांनी काळवीटावर प्राथमिक उपचार करुन त्याला वन विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

सचिन माळीचे कौतुक 

हातातील काम सोडून घटना स्थळावर धाव घेत जखमी काळवीटास उपचारासाठी घेऊन आल्याने एक प्रकारे काळवीटास जिवदानच दिल्याने शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे. यापुर्वीही बोहर्डी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या घुबडीस जिवदान दिले होते.

 

पाण्याची व्यवस्था करावी 

उन्हाळा सुरू झाल्याने जंगल परिसरात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते गावाच्या दिशेने येतात. असेच मागील तीन ते चार दिवसापासून हे काळवीट रस्त्यावर इकडून तिकडे ये जा करीत असल्याने हा प्रकार घडला. जर वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम प्रकारच्या तळ्या सारखे करून त्यात पाणी भरून ठेवले तर किमान उन्हाळ्यात तरी प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी भावना रसवंती चालक नाना माळी यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.