महाराष्ट्रात CBI ला तपासाची परवानगी नाहीच

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) केंद्रीय अन्वेषण विभागाला (Central Bureau of Investigation) महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही राज्याची परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी (Actor Sushant Singh suicide case) झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात, महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय असा संघर्षही निर्माण झाला होता. तर महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास असल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर या निर्णयात बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शिंदे सरकारनेही हा नियम कायम ठेवला आहे.

महाराष्ट्रासह पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, केरळ व मेघालय या राज्यांतही सीबीआयला सर्वसाधारण संमती दिली गेलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.