जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व जळगाव वनविभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी, 2023 रोजी नियोजन भवन, जळगाव येथे जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी भुषविले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी केले. यावेळी होशिंग यांनी उपस्थितांना जैवविविधता कायदा 2002 व या कायद्याची पार्श्वभूमी बाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जैवविविधता कायद्याचे महत्व सांगत त्याची विविध माध्यामांच्या साहायाने व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. तर मुख्य कार्यकारी पंकज आशिया यांनी जैवविविधतेचे महत्व पटवुन देतांना त्या बाबतच्या नोंदी अद्यावत ठेवणे महत्वाचे व गरजेचे असल्याबाबत नमुद केले. या कार्यशाळेस डॉ. शाम बजेकल व दौलत वाघमोडे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.

जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापना कर्तव्य व जबाबदारी तसेच प्रवेश पद्धती वाटणी प्रक्रिया व त्याचे होणारे फायदे याबाबत डॉ. बजेकल यांनी मार्गदर्शन केले. तर वाघमोडे यांनी जैवविविधता नोंदवही तयार करणे, अद्यावत करणे, जैवविविधता वारसास्थळ घोषित करणे व महाराष्ट्र जनुककोष प्रकल्प याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस डॉ. मनोज कुमार, चोपडा यांनी जळगाव जिल्ह्यातील जैवविविधता याबाबत मार्गदर्शन केले. तर सागर धनाड यांनी चला जाणूया नदीला या योजनेबाबत माहिती दिली.

या कार्यशाळेस जळगाव जिल्ह्यातील ग्रामस्तरीय जैवविविधता समितीचे अध्यक्ष व सचिव तसेच नागरीक्षेत्रातील जैवविविधता समितीचे अध्यक्ष व सचिव, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तालुका कृषि अधिकारी, सहा. वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, विविध अशासकिय संस्थांचे पदाधिकारी, तसेच नागरीक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी यु. एम. बिराजदार, सहायक वनसंरक्षक एन. ए. बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव दिपक पाटील, अजय रायसिंग, वनरक्षक, जळगाव ए. बी. चव्हाण, सर्वेअर, जळगाव व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, एरंडोल यांनी केले. असे सहायक वनसंरक्षक, यु.एम. बिराजदार, जळगाव वनविभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.