गॅसच्या बर्नरवर भाजलेल्या भाकरी-चपातीमुळे होऊ शकतो कॅन्सर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या रोजच्या जेवणात चपाती, पोळी किंवा फुलका, भाकरी हा अविभाज्य भाग आहेत. भाकरी चपाती, फुलका बनवण्यासाठी पद्धत देशभर सारखीच आहे. फक्त ती चांगली भाजली जावी, खमंगपणा यावा. म्हणून आजही चपाती, भाकरी, फुलके चुलीच्या ज्वाला किंवा विस्तव अथवा निखाऱ्यावर भाजली जाते. तसेच अशा प्रकारे भाजलेली चपाती, भाकरी खायलाही चवदार लागते. मात्र हल्ली चपाती किंवा भाकरी भाजण्याचे काम गॅसवर केले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या प्लिअर्समुळे हे आणखी सोपे झाले आहे. पण अशा भाजलेल्या चपातींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, असे एका संशोधनातून पुढे आले आहे.

गॅसच्या बर्नरवर चपाती किंवा भाकरी भाजल्याने नेमके काय होते?
गॅसवरील बर्नरवर भाकरी किंवा चपाती भाजल्याने भाकरी-चपातीमध्ये हेटेरोसायक्लिक अमाइन आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स तयार होतात. त्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात. या घटकांच्या सेवनामुळे मानवी कर्करोगाचा धोका असतो. पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित न्यूट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.