महाऔष्णिक विज केंद्र परिसरात दहशत माजविणाऱ्या; वाघाला जेरबंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर; चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर, ऊर्जानगर, वेकोली व महाऔष्णिक विज केंद्र परिसरात दोघांचा बळी घेऊन दहशत माजविणाऱ्या वाघांपैकी काल मंगळवारी (21 फेब्रुवारी 2022) ला रात्री साडेनऊच्या सुमारास एका पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात आले आहे. उर्जानगर वसाहतीत रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करताना वाघांच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले वनविभाग व महाऔष्णिक विज केंद्राच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

मागील आठवड्यात बुधवारी (16 फेब्रुवारी) व गुरूवारी (17 फेब्रुवारी) रोजी दुर्गापूर व ऊर्जानगर परिसरात दोघांचा वाघाने बळी घेतल्याची घटना नूकतीच घडली होती. बुधवारी साडेदहाच्या सुमारास महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी परतणाऱ्या 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने रस्त्यातून फरफटत नेत ठार केले होते. दुसऱ्या दिवशी त्या कामगाराचा मृतदेह आढळून आला होता.

या घटनेने कामगारांनी कामबंद आंदोलन करून जीव वाचविण्यासाठी आंदोलन केले होते. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशीही रात्री अकराच्या सुमारास ऊर्जानगरातील एका सोळा वर्षीय राज भडके या मुलाला वाघाने वस्तीतून उचलत फरफटत नेऊन ठार केले. रात्रभर शोधमोहीम सुरु केली असता वेकोली वर्कशॉप परिसरात मृतदेह आढळून आला होता. या दोन्ही घटना भरवस्तीत घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी वाघांच्या बंदोबस्त करून नागरिकांचे संरक्षण करण्याची मागणी केली होती. दरम्यान मंत्री तनपूरे ताईंनी चंद्रपुरात येवून तातडीने वाघांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.