हक्काच्या जागेसाठी सांगवी प्र. लो. येथील महिलेचे उपोषण

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. येथे भोगवटा धारक महिलेच्या जागेवर गावातील इतर नागरिकांनी अतिक्रमण केल्याने महिलेने वारंवार ग्रामपंचायतीस लेखी अर्ज देवून अतिक्रमण काढण्यासाची विनंती केली असतांनाही अतिक्रमण काढले जात नसल्याने महिलेने पाचोरा येथील तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

विमलबाई गोबा मांग असे उपोषण करणाऱ्या महिलेचे नाव असून महिलेस येथील विनोद सुरेश कांबळे, प्रकाश अशोक कांबळे, गणेश रमेश पगारे व रविंद्र जंगलू चव्हाण यांनी पाठींबा दर्शविला आहे. ‌

तालुक्यातील सांगवी प्र. लो. येथे विमलबाई गोबा मांग या महिलेचे मयत सासरे कै. तोताराम मांग यांची ग्रामपंचायत हद्दीत ३० वर्षांपासून २ हजार ४०० चौरस स्केअर फुट जागा असून त्यावर विमलबाई गोबा मांग यांचा भोगवटा व उताऱ्यावर नाव आहे. मात्र या जागेशेजारील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. महिलेने जागा खाली करा अशी रितसर विनंती केली असता सदर इसमांनी महिलेस दमदाटी केली. नावावर असलेली जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढावे या मागणीसाठी महिलेने उपोषण सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.