हर्ष निर्घृण हत्या प्रकरण; बजरंग दलाकडून तीव्र निषेध

0

मलकापुर,लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:-कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची  निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेचा मलकापूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी मा. महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविला.मा महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्यच आहे.

ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.

भारतात घडलेल्या 1946 च्या डायरेक्ट अँक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद या निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.

सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे.

कायदा कायद्याचे काम करेलच परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करुन सुधरावे ही अपेक्षा आम्ही यानिमित्ताने करतो आहोत.

पाँपुलर फ्रंट आँफ इंडिया ,कँम्पस फ्रंट आँफ इंडिया व सोशल डेमाँक्रँटिक पार्टी आँफ इंडियाया संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. असे आवाहन विश्व हिंदू परिषद करीत आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख मनीष लखानी,विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल प्रखंड संयोजक  दीपक कपले, नगर मंत्री शामसिंह हजारी, विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख संमती जैन, विश्व हिंदू परिषद तालुका उपाध्यक्ष बबलू बैरागी,विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष आशिष माहुरकर, विश्व हिंदू परिषद शहर उपाध्यक्ष अमोल टप, बजरंग दल गौरक्षा प्रमुख संदीप राजपूत, भा.ज.पा शहराध्यक्ष मिलिंद डवले, भाजपाचे शहर उपाध्यक्ष संतोष बोंबटकार,भा.ज.यु.मो.जिल्हा उपाध्यक्ष नाना ऐशी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश (जैन गुजराती प्रकोष ) चे अध्यक्ष डॉ. योगेश पटणी, सावन सिंह राजपूत,पप्पू ठाकूर , हरीश करंगाळे,रमेश देशपांडे राजकुमार वानखडे,यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.