वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

रुग्णांच्या हाताची बोटे मोडून, करायचे 'हे' काम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई पोलिसांनी बनावट वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका वॉर्ड बॉयसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी इंजेक्शन देऊन लोकांची बोटे मोडायचा आणि नंतर रुग्णाला डॉक्टरकडे पाठवून बनावट वैद्यकीय अहवाल बनवायचा. त्यानंतर या वैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांत तक्रार करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बनावट वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह चौघांना अटक केली आहे.

रॅकेटचा मुख्य सुत्रधार अटकेत
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार वासू ठोंबरे होता. त्याने ही विचित्र पद्धत वापरली. तो प्रथम त्याच्या क्लायंटला बोटे तोडण्याआधी इंजेक्शन देत होता. नंतर रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचा. जिथे तो बोटाला झालेल्या दुखापतीचा उल्लेख करून वैद्यकीय कागदपत्रे तयार करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

कसा झाला खुलासा?
महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात फैजन अहमद खान नावाच्या व्याक्तीच्या तुटलेल्या बोटांवर उपचार करतांना संशयास्पद वाटलं. त्यानंतर वॉर्ड बॉयचा पर्दाफाश झाला. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर फैजनला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तेथे त्याने पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितलं.

वॉर्ड बॉय पोलिसांना सांगितलं की, त्याच्या गृहनिर्माण सोसायटीतीला रहिवाशांच्या काही वादातून त्याला इतर तिघांना अडकवायचं होत. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपींना अटक केली. ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हे करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.