बस वेळेवर लागत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस ही वेळेवर सुटत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बस स्थानकात पाऊणतास बस रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

पारोळा तालुक्यात ११४ खेडे आहेत या गावांना एरंडोल व अमळनेर विभाग संयुक्तपणे बस सेवा पुरविते यांचा सर्व कारभार अमळनेर विभाग पाहत असतो, ग्रामीण भागातून पारोळा शहरात शिकण्यासाठी सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी हे नेहमी दररोज बसने अपडाऊन करतात. या पार्श्वभूमीवर अमळनेर आगाराकडून वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने, शाळा सुटुन देखील विद्यार्थ्यांना तासंतास बस स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत रहावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे, आज तामसवाडी करमाड, रताळे येथील शाळेतील विद्यार्थी बारा वाजता बस स्थानकात आले असता, त्यांना जाण्यासाठी दुपारी एक वाजेची सुटणारी बस आज अडीच वाजेपर्यंत लागलीच नव्हती हे आजचे नसून एक दिवसाआड नेहमीच असेच होत असल्याने सकाळपासून शाळेत आलेले भुकेले विद्यार्थी घरी जाण्यासाठी ताटकळत होते. संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या आवारातच मुख्य प्रवेशद्वाराजवळ  खाली बसून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात किमान दीडशे ते दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. अर्धा ते पाऊण तासापर्यंत रस्ता रोको करण्यात आला.

यामुळे बस स्थानकातून एकही बस जात नव्हती व येतही नव्हती यानंतर माजी पालकमंत्री डॉ, सतीश पाटील यांनी अमळनेर आगार प्रमुख चौधरी यांच्याशी या विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीवर बोलणे झाले. त्यानंतर स्थानक प्रमुख संजय पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत स्थानकात व आजूबाजूच्या परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. यानंतर तीन वाजेच्या सुमारास ०४१९ क्रमांकाची तामसवाडी, करमाळ, रताळे बस या मार्गासाठी सोडण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.