Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेत निवड
    क्रीडा

    अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेत निवड

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 28, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आदिवासी क्षेत्र म्हणुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावातुन जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयमुख तरूण क्रिकेटच्या अष्टपैलु खिलाडीची आंतरराष्ट्रीय  क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली आहे.

    अट्रावल तालुका यावल येथील रहिवासी असलेल्या कल्पेश नारायण शिरसाळे हा फैजपुर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी असुन, मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणा पासुनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता. अट्रावल सारख्या गावात अतिश्य प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धपर्यंत भरारी घेतली आहे.

    दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पासुन UAE दुबई येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धसाठी क्लपेश शिरसाळे याची INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ निवड करण्यात आली असुन या संघात निवड झालेला तो महाराष्ट्र राज्यातुन एकमेव खेळाडु आहे. नुकत्याच राजस्थान येथे झालेल्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धतील सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सराव सामन्यांमध्ये देशातील सुमारे ५००च्या वर क्रिकेटच्या खेळाडूंनी यात भाग घेतला होता यापैकी संपुर्ण देशातुन ३० खेळाडुंची निवड झाली. त्यात महाराष्ट्र राज्यातुन कल्पेश शिरसाळे हा एकमेव खेळाडू असुन या INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ, मुंबईच्या निवडी झालेल्या प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या सराव सामाऱ्यात कल्पेश यांने केलेल्या अष्टपैलू कामगीरीमुळे त्याची ही निवड करण्यात आली आहे.

    या सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणुन सलाह काजी व मधुसर यांचे मार्गदर्शन त्यास लाभले. आदिवासी ग्रामीण क्षेत्रातील छोटयाशा गावात जन्माला आलेल्या या खेळाडुच्या अंतरराष्ट्रीय लिगच्या क्रिकेट सामान्यांसाठी संघात निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Atrawal International League Cricket Tournament Kalpesh Shirsale Sport News Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif