रात्री ३ ला गर्लफ्रेंडसाठी पिझ्झा घेऊन तिच्या घरी गेला… अन जीवानिशी गेला…

0

 

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

हैदराबादच्या बोराबांडा भागात एका तरुणाचा आपल्या गर्लफ्रेंडच्या घराच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री उशिरा पिझ्झा घेऊन मैत्रिणीच्या घरी गेला होता तरुण तेवढ्यात प्रेयसीच्या वडिलांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात प्रियकर छतावरून पडला, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय शोएब मध्यरात्री त्याच्या मैत्रिणीच्या इमारतीच्या टेरेसवर पिझ्झा घेऊन रात्री उशिरा डेटसाठी गेला होता, तेव्हा त्याला तिच्या वडिलांचा पायऱ्यांवरून येण्याचा आवाज आला. पोलिसांनी सांगितले की, घाबरलेल्या शोएबने छताच्या काठाकडे धाव घेतली आणि काही तारांचा आधार घेण्याचा प्रयत्न करत असताना तो खाली पडला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

पहाटे 3 वाजता तरुण गच्चीवरून पडला, त्यानंतर त्याला उस्मानिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे पहाटे 5:30 च्या सुमारास त्याला मृत घोषित करण्यात आले. पीडित तरूणाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.