10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग ! परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 10 मिनिटे जास्तीचे मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी हा वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून या निर्णयाबाबतची माहिती दिली आहे.

बोर्डाने उचलेले हे पाऊल

गेल्या काही दिवसांत प्रश्नपत्रिका फुटल्याचा काही घटना निदर्शनास आल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पारण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलेले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांच्या मागणीचा विचार करून पुन्हा एकदा 10 मिनिटे वेळ वाढवूण देण्यात येणार आहे. यामुळे दोन तासांचा पेपर 2.10 तासांचा होईल आणि 3 तासांच्या पेपरसाठी 3.10 मिनिटांचा वेळ दिला जाईल.

 परीक्षांचे वेळापत्रक

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांमध्ये सकाळच्या सत्रात सकाळी 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 03.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 02.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रामधील 11 ते 2.10, 11 ते 1.10, 11 ते 1.40 अशा परीक्षांच्या वेळा असणार आहेत. तर दुपारच्या सत्रातील 3 ते 6.10, 3 ते 5.10 आणि 3 ते 5.40 अशा प्रकारे सर्व पेपरसाठी वेळ 10 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.