श्री सत्य साई समिती जळगाव तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

श्री सत्य साईबाबांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून जळगाव सत्य साई समिती आणि रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विदयमाने आज दिनांक २०/११/२२ रविवार रोजी संकट विमोचन हनुमान मंदिर परिसरात रक्तदान शिबिर पार पडले.

यावेळी शिबिराची सुरुवात ओंकार आणि साई गायत्री मंत्रोचाराने झाली. यादरम्यान रक्तदान शिबिरात न्यायालयीन कर्मचारी, बँक कर्मचारी, पोलिस, व्यावसायीक, आणि साई परिवारातील पुरुष आणि महिला सदस्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांना चहा, बिस्कीट, फळे देण्यात आली.

शिबिराच्या यशविस्तेसाठी सुधांशू भारद्वाज, सौ.महिमा भारद्वाज, बी. जी.नाईक, सौ.मीता नाईक, सुशील महाजन, प्रभाकर महाजन, सौ.अनिता महाजन, कु.रेनेश शिरोळे, कु. देवयानी नाईक तसेच रेड प्लस ब्लड बँकेचे कैलास पेठवे आणि त्यांचे सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले.

रक्तदान चालू असताना साई भक्तांनी अखंड साई भजनं गायली. शिबिराची सांगता साई आरतीने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.