जीवे मारण्याची धमकी देत मोलकरणीवर अत्याचार; गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

घरमालकाने मोलकरणीवर ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पुंडलिक पाटील (रा. पहूर ता. जामनेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पिडीता घरात फरची पुसत असतांना अचानकपणे प्रकाश पाटील याने जबरदस्ती तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात 48 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स.पो.नि प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.